ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तृणमूल काँग्रेसच्या आमदारच्या घरातून ११ कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त, नोटांचा ढीग पाहून अधिकारीही चक्रावले

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री झाकीर हुसेन यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने अकरा कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांचा ढीग पाहून अधिकारीही चक्रावले. हुसेन त्यांच्या घराव्यतिरिक्त मिलमधूनही ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

झाकीर हुसेन हे मुर्शिदाबादच्या जंगीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ममता बॅनर्जी सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. हुसैन यांच्या घरातूनच एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय तांदूळ आणि पिठाच्या गिरणीतून दहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एकट्या मुर्शिदाबादमधून अकरा कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने एकूण २८ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

गुरुवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने झाकीर हुसेन यांच्या घरावर छापा टाकला होता. हुसेन यांच्या दोन विडी कारखान्यांमधून साडेपाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रोख रकमेशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा झाकीर हुसेन यांनी केला आहे. “मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांच्या बाजूनेही मला पूर्ण सहकार्य मिळाले. माझ्याकडे असलेल्या रोख रकमेची सर्व कागदपत्रे आहेत. मी वेळोवेळी कर जमा करतो, त्यामुळे मला कशाचीही भीती वाटत नाही,” असे स्पष्टीकरण झाकीर हुसेन यांनी दिले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!