ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच २२२ हून अधिक शासकीय आदेश जारी

मुंबई : वृत्तसंस्थां

राज्यात महायुती सरकारने मंगळवारी आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २२२ हून अधिक शासकीय आदेश जारी केले. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या ८ तासात सुमारे २२२ सरकारी आदेश जारी करण्यात आले. अशा प्रकारे महायुती सरकारने आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी तासाला सरासरी २७ शासकीय आदेश जारी केले. दरम्यान,सरकारने २७२ आमदारांना प्रत्येकी ४० लाखांचाही निधीही जाहीर केला.

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वसमत, जि. हिंगोली) प्रकल्पाकरिता ७०९.२७ कोटी रुपये अतिरिक्त निधी, राज्यातील तीर्थक्षेत्रांचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत समावेश करण्यास मान्यता आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) या संस्थेद्वारे संचालित सिद्धार्थ विहार वसतिगृह ( वडाळा, मुंबई) या इमारतीच्या बांधकामाबाबतचा ४१.२१ कोटी रुपये आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत “मातृभूमी प्रतिष्ठान” या संस्थेस सोलापूर येथे ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमता असलेले खाजगी कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्त्वावरील नवीन “कर्मयोगी श्री गजानन किर्तीकर कृषि महाविद्यालय” सुरु करण्यास मान्यता देण्याच्या आदेशाचा समावेश आहे.

माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनामार्फत अदा करण्याचा घेण्यात आला होता. या निर्णयाच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यातील ६५२ पात्र खातेदारांना ५५.८२ लाख रुपये रक्कमेची व्याजमाफी देण्यात आली होती. शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ महिनांच्या व्याजमाफीची रक्कम अदा करण्यासाठी पंचनाम्याची अट वगळण्यात शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!