ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबईत बोटचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

मुंबई, वृत्तसंस्था 

 

मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली. या बोटीमध्ये ११०  प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०१ जणांना वाचवण्यात आले आहे. सात ते आठ प्रवाशी अजून बेपत्ता आहे. नौदलाच्या १४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे.

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. त्यानंतर बोट उलटली.

नीलकमल बोटीच्या मालक राजेंद्र परते यांनी सांगितले की, नेव्हीची स्पीड बोट आली. तिने बोटीला राऊंड मारला. त्यानंतर ती गेली. त्यानंतर पुन्हा ती बोट आली. त्या बोटीने नंतर आमच्या नीलकमल बोटीला धडक दिली.

नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता ८० असताना त्यातून ११० जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या प्रकरणी १३ जणांचा मृत्यू आहे. त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे.

अपघातात १०१ लोकांना वाचवण्यात आले आहे. संध्याकाळी ७.३० पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.  या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बोटीवर तब्बल ११० जण होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) अधिकृतपणे देण्यात आली. विविध रुग्णालयामध्ये दाखल असलेले प्रवाशी ११० होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बोटीत असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!