मुंबई : कोरोनाकाळात बीएमसीत घोटाळ्यांच्या आरोपाखाली ईडीनं आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मोठी मागणी केली आहे. इक्बालसिंह चहल यांनी माध्यमांसमोर राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता चहल यांच्या मागणीमुळं शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोटाळ्यांचे आरोप केले होते. कोविड केयर सेंटरच्या उभारणीच्या कामात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणातील कागदपत्रं ईडी अधिकाऱ्यांकडे सोपवली होती. त्यानंतर आता ईडीनं या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे