नागनळळी (ता. अक्कलकोट) : प्रतिनिधी
येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला सोलापूर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा पुरस्कार २०२६’ या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्रातील मराठी शाळा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी पूर्वी पासून सुरू असलेला लढा भविष्यातही जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाराष्ट्र शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलारे, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड,
सोलापूर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, कादर शेख, शिक्षण अधिकारी (प्राथमिक), सोलापूर, गणेश सोनटक्के, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सोलापूर हे मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना आश्रमशाळेचे प्राचार्य मुजावर आय. एम., मुख्याध्यापक शेख आर. जी., तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मानामुळे नागनळळी आश्रमशाळेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल जिल्हास्तरावर घेतली गेली आहे.