ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात माजी आमदार आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक

सोलापूर वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत  सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला आहे.

 

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर सायंकाळी पाच नंतर प्रचारासाठी बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली आहे. त्यानंतर दगडफेकीची ही माहिती आडम मास्तर यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी ऍड. अनिल वासम यांना दिली. त्यानंतर ऍड. वासम यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी आले, त्या वेळीही गोंधळ सुरू होता. दगडफेक करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या वासम यांनाही त्यांनी धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेतले आहे.

 

या घटनेवर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,  सोमवारी (दि.११) सायंकाळी पाचच्या सुमारास मी कार्यालयात गेलो. त्या ठिकाणी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यानंतर सभा आणि कॉर्नर बैठका घेतल्या. तोपर्यंत रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. बापू नगरमधील कार्यकर्त्यांनी जे की स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात, अशा दोन ते तीन तरुणांनी दारू पिऊन शिवीगाळ करत सोमवारी रात्री आठच्या सुमारास माझ्या घरावर दगडफेक आणि विटा फेकल्या. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना अडवलं, मात्र त्यांनी अडवणाऱ्या तरुणांनाही धक्काबुक्की केली.  दरम्यानच्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनिल वासम त्या ठिकाणी आले. मात्र, त्यांनाही त्या तरुणांनी धक्काबुक्की केली. तोपर्यंत ही घटना पोलिसांना समजली. माझ्या घरासमोर पोलिस आले, त्यांनी त्या तरुणांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहेत. मात्र, माझी मागणी आहे की भविष्य काळात माझ्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा होऊ शकतो. जनता अनावर झाली तर त्यांना रोखणं माझ्या हातात राहणार नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही, यासाठी तातडीने संबंधितांवर कडक कारवाई करावी’, असे आडम मास्तर यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!