मुंबई वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी आजच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज भरले होते. तसंच आपल्याला निवडणूक लढवण्यास विरोध होत असतानाही आपण निवडणूक लढवणार, पक्षानं जर वेळेत एबी फॉर्म दिला तर ठीक अन्यथा अपक्ष लढू असा इशारा दिला होता.
मात्र आज दुपारी ३ वाजेपर्यंत मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसडून एबीफॉर्म मिळाला आणि त्यांनी अधिकृत उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला. मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. आता मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान सकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना त्यांनी म्हटलं की, मला पक्षाकडून अद्याप एबी फॉर्म प्राप्त झालेला नाही पण जर वेळेपूर्वी ३ वाजेपर्यंत मला पक्षाकडून फॉर्म मिळाला तर मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढेल अन्यथा अपक्ष म्हणून लढणार.
झुंडशाही आणि गुंडशाही वाढल्यानं लोक आग्रहास्तव मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर मला निवडणूक लढवण्यापासून रोखलं जात आहे, कोणाचा मला विरोध आहे हे माहिती नाही. पण मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.