ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे अक्कलकोटमध्ये आंदोलन

अक्कलकोट, दि.१७ : भाजपशासित
केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल, डिझेल आणि खताची दरवाढ केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांच्या आदेशानुसार
सोमवारी अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.यासंदर्भात तहसीलदार अंजली
मरोड यांना निवेदनही देण्यात आले.


सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आपण दरवाढ रोखू असे आश्वासन दिले होते परंतु आज घडीला तसे चित्र दिसत नाही.त्यामुळे
केंद्र सरकारबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये
चीड व्यक्त होत आहे. कोरोना संकट असताना गेल्या वर्षभरात शेतकरी
हतबल झाला आहे. पिकांना भाव नाही. सतत लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत.बरेच व्यवसाय बंद असल्यामुळे भाजीपाल्याला भाव मिळत नाही. शेतकरीवर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा इंधन दरवाढ तसेच खताची होत असलेली दरवाढ हे योग्य नाही,याबाबत भाजपने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आपण याचा निषेध करत आहोत, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि शहराध्यक्ष मनोज निकम यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष बळीराम
साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन जिल्ह्यात ठिक – ठिकाणी होत आहे.सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहेत त्यांना पुढील जून महिन्यात खाते मोठ्या प्रमाणात लागणार आहेत.अशा परिस्थितीत
खतांची झालेली दरवाढ तसेच पेट्रोल
आणि डिझेलची दरवाढ मागे घ्यावी,
असे निवेदन तहसीलदार अंजली मरोड
यांना पदाधिकार्‍यांच्यावतीने देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, जिल्हा राष्ट्रवादीचे संघटक विक्रांत पिसे, तालुका कार्याध्यक्ष माणिक बिराजदार,तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने,अल्प संख्याक अध्यक्ष इस्माईल फुलारी,गोटू माने,
शहराध्यक्ष सिकंदर चौऊस,राम जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!