---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याची उत्सुकता लागली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा होत आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज दाखल झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!