ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर : मंत्री मुंडेंवर मोठी जबाबदारी !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणूक अनुषंगाने राज्यात आम्ही एकत्रित चर्चा करून राज्यात 48 जागांबाबत कोणी कोणती निवडणूक लढवणार आहोत, याबाबत 99 टक्के काम झाले आहे. 28 मार्च रोजी मुंबईत एकत्रित सर्व जागा घोषित होतील. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे निवडणूक लढवणार आहेत. विविध घटक पक्ष एकत्रित येऊन आम्ही राज्यातील सर्व जागा लढवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, संजय बनसोडे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटील हे 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते, आज ते पुन्हा स्वगृही येत आहेत. त्यांना शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यास तिकीट देण्यात येईल, असे स्पष्ट संकेत देखील त्यांनी दिले. भाजपने गेल्या निवडणुकीत 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला होता. त्यामुळे या सर्वांचा विचार करुन जागा वाटप निश्चित केले जात असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळत आहे, असे दाखवून चुकीचा प्रचार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजप आणि शिवसेना यांनी ज्या जागा जिंकल्या त्याची त्यांनी मागणी केली. आम्ही आम्हला ज्या जागा पाहिजे त्याबाबत भूमिका घेतली आणि त्याला इतर दोन पक्षांनी सहकार्य केले आहे. आमच्या मंत्र्यांवर एक लोकसभा आणि आमदार यांच्यावर विधानसभा जबाबदारी दिली आहे. आमचे उमेदवार मतदारसंघात नसेल तरी इतर मित्र पक्ष यांच्या सोबत प्रचार यंत्रणा राबवण्याचे निर्देश आहे. जाहीरनामा बाबत चर्चा करून काम सुरू आहे. आमचे पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून याची जबाबदारी धनंजय मुंडे यांना दिली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!