सांगवी बु जलाशयावरील मोरी त्वरित उघडण्याची गरज, पाटबंधारेचे दुर्लक्ष, तानवडे यांच्या शिष्टमंडळाकडून अप्पर जिल्हाधिकार्यांना निवेदन
अक्कलकोट : सांगवी बु (ता. अक्कलकोट) हे गाव दरवर्षी पुराच्या विळख्यात सापडत आहे. बोरी नदीवर ब्रिटिशकालीन पुल आहे त्या पुलाला तीन मोरी आहेत. पण ते नादुरुस्त व बंद असल्याने गावकऱ्यांना पुर परस्थितीशी सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
या पार्श्वभूमीवर मोरी उघडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी केली आहे. त्याशिवाय सांगवी गावातील पूरस्थिती कमी होणार नाही. मोरी बंद असल्याकारणाने कुरनूर धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बोरी नदीपात्रात गाळ साठल्याने बोरी नदीचे पाणी पात्र सोडून सांगवी गावात पाणी शिरत आहे. सदर गावाच्या पुराची पाहणी करताना गावातील नागरिक मोरी चालू करण्याची मागणी केल्याने जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी सदर मोरी खुली व दुरुस्ती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शमा पवार यांची भेट घेऊन दिले. सदर कामा संदर्भात बैठक लावून हा विषय त्वरित संबंधीत विभाग आणि सोबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावण्यात येणार आहे.हा विषय मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, प्रदीप सलबत्ते, र मेश चिडगुंपी, सिद्धाराम नरूणे आदी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.