ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कामाच्या क्षेत्रात नवीन करार होतील आणि नवीन योजना बनतील.

आजचे राशिभविष्य दि.२४ मार्च २०२५

 

मेष राशी

श्रीगणेश सांगतात की, नातेवाईकांसोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील. तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाबरोबरही शेअर करू नका. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्‍यांना मदत करा. परिस्‍थिती संयमाने हाताळण्याचा प्रयत्न करा. कारखाना, उद्योग इत्यादींशी संबंधित व्यवसायात काही नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे; परंतु कामाच्या ठिकाणी शिस्त राखणे आवश्यक आहे. कुटुंबासाठी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढणे आवश्यक आहे.

वृषभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंब आणि सामाजिक कार्यात तुमची उपस्थिती महत्त्वाची असेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवणे तुम्हाला त्रासदायक ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वरिष्ठांचा सल्ला घेणे उचित ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.

मिथुन राशी

आर्थिक मालमत्तेशी संबंधित किंवा पैशाशी संबंधित व्यवहारांसाठी काही योजना असतील. घरातील वातावरण शिस्तबद्ध ठेवण्यासाठी तुम्‍ही आग्रही असाल. निरर्थक वाद टाळा. व्यावसायिक व्यवहार गुप्त ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. तरुणाई करिअरबाबत गंभीर असेल. बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य परस्पर सामंजस्याने समस्या सोडवतील.

कर्क राशी

श्रीगणेश म्हणतात की, यावेळी ग्रह, नक्षत्र तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल आणत आहेत. कामाचा काळजीपूर्वक विचार करून काम करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. उतावीळ स्वभाव तुमच्यासाठी समस्या निर्माण करेल. आत्मपीरक्षणातून तुम्‍हाला योग्य आणि अयोग्यची जाणीव देईल. व्यावसायिक कार्यात सुरू असलेले अडथळे दूर होतील. सहकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवनात योग्य सुसंवाद राहील. जुन्या मित्राला भेटल्याने आठवणी ताज्या होतील.

सिंह राशी

आज दैनंदिन समस्यांपासून तुमची सुटका मिळेल. तुम्ही आत्मविश्वास आणि उर्जेने तुमच्या कामात व्यस्त राहाल. तरुणाई त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उपलब्ध होतील. घाबरण्याऐवजी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. रागावण्याऐवजी शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.

कन्या राशी

श्रीगणेश म्हणतात, सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात वर्चस्व राहील. मालमत्ता खरेदी आणि विक्री खूप काळजीपूर्वक करावी. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना काही अडचणी येऊ शकतात. आयात-निर्यातशी संबंधित व्यवसायात कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. कामाच्या ठिकाणी घरी अनुभवी लोकांच्या सल्ल्याचा विचार करा.

तुळ राशी

तुम्ही तुमची अपूर्ण कामे ऊर्जा आणि आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. तुमचे राजकीय आणि सामाजिक संपर्क स्रोत मजबूत करा. भावनिकता आणि उदारता यासारख्या काही सवयी बदलणे आवश्यक आहे. यावेळी व्यवसायातील विस्ताराशी संबंधित यश तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. नकारात्मक विचार तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात, तुमची ऊर्जा आणि कार्यक्षमतेचा पूर्ण वापरा. तुमच्या संशयी वृत्तीमुळे इतरांना त्रास होण्‍याची शक्‍यता. एकमेकांवरील विश्वासामुळे वैवाहिक जीवनात नातेसंबंध मजबूत होतील. स्वभावात थकवा जाणवेल.

धनु राशी

आज दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. परस्पर सामंजस्याने गैरसमज देखील दूर होतील. यंत्रसामग्री किंवा लोखंडाशी संबंधित व्यवसायात काही समस्या येऊ शकतात. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तुमचे काम सहज पूर्ण होईल.

मकर राशी

श्रीगणेश सांगतात की, दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित राहील. तुम्ही तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. तरुणांना त्यांच्या भविष्याशी संबंधित मोठी कामगिरी मिळू शकते. कुटुंबात मतभेदावर कोणताही निर्णय सुज्ञपणे घ्या. वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ देऊ नका. पती-पत्नीमध्ये योग्य सुसंवादाची भावना निर्माण होईल.

कुंभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम करून तुमचे ध्येय साध्य करू शकाल. मुलांसोबत थोडा वेळ घालवल्याने त्यांचे मनोबल वाढेल. कोणताही प्रवास टाळा. व्यवसायात नवीन काम सुरू करण्याबाबत योजना आखाल. सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मीन राशी

श्रीगणेश सांगतात की, आज नातेसंबंध सुधारतील. घराच्या देखभाली आणि सजावटीशी संबंधित कामांला प्राधान्‍य द्‍याल. सकारात्मक विचार ठेवा आणि तुमच्या वागण्यात अधिक परिपक्वता आणा. कामाच्या क्षेत्रात नवीन करार होतील आणि नवीन योजना बनतील. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील अनुभवी सदस्‍यांचा सल्‍ला घ्‍या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group