---Advertisement---

उपमुख्यमंत्री शिंदेंची उडविली खिल्ली : समर्थकांनी केली स्टुडिओची तोडफोड !

By team
On: March 24, 2025 9:47 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून राज्यात स्टँडअप कॉमेडियन कार्यक्रम अनेक शहरात वादात सापडत असल्याने आता कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या राजकारणावरील व्हिडिओ वादात सापडला आहे. व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती.

रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. रविवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील द युनिकॉन्टिनेंटल कार्यालयात पोहोचले. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ येथे शूट करण्यात आला आहे. शिवसेना समर्थकांनी स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर ते तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. कुणाल कामराला तत्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले – मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला तत्काळ अटक करावी. उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध अशा शब्दांचा वापर अजिबात सहन केला जाणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने धडा शिकवू.

या संपूर्ण वादावर शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँड-अप कॉमेडियन आहे. जेव्हा कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंग्यात्मक गाणे लिहिले तेव्हा शिंदे टोळी अस्वस्थ झाली. त्याच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. देवेंद्रजी, तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात! शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, कुणाल कामरा तुला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रवास करू देणार नाही. यूबीटी ग्रुप आणि संजय राऊत यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर तू एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत आहेस. आम्ही बाळ ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, जर आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुम्हाला भारतातून पळून जावे लागेल.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!