ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किंमती होणार अजून स्वस्त

नवी दिल्ली : वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती अजून स्वस्त होणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमती घसरल्याने खाद्य तेलाच्या बाजारात मोहरी, सोयाबीन, शेंगदाण्यासहित तिळाच्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. परदेशातून आयात खाद्यतेलाच्या किंमतीत कमालीची घसरण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आयात तेलापेक्षा देशातील खाद्य तेलाचे दर जास्त आहेत. एका व्यक्तीसाठी एका दिवशी ५० ग्रॅम तेलाचा वापर होत असला तरी देशातील महागाईवर त्याचा परिणाम दिसून येतो. खाद्यतेलाच्या किंमतीचा बऱ्याच क्षेत्रावर परिणाम होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!