ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इतर कोणीही दादा होऊ शकत नाही ; प्रदेशाध्यक्ष तटकरे

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येथून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी जनतेतून मागणी होत आहे. बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार अजितदादांनी केला आहे. त्यामुळे जे बोलतात ते करतात म्हणून दादा एकच आहेत. इतर कोणीही दादा होऊ शकत नसल्याचा टोला आमदार रोहित पवार यांना बुधवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला आहे. तर शरदचंद्र पवार पक्षाकडून नैराश्यातून टीका होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत मान्यता व पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर गुरुवारी पुण्यात सर्व कार्यकारिणी सदस्य, सेल, पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, आजी- माजी आमदार, माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. याप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, युवती काँग्रेस शहर सरचिटणीस गौरी पाटील आदी उपस्थित होते. तटकरे पुढे म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे राज्यसभेवर जाण्याचा माझा प्रश्न नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनिल तटकरे यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून घेण्यात आला आहे. अनिल तटकरे हे गेल्या दहा वर्षांपासून वेगळ्या पक्षात कार्यरत आहेत. घराघरात विचारधारा ही वेगळी असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!