---Advertisement---

जरांगे पाटलांनी बोलविली बैठक : ‘या’ दिवसापासून पुन्हा आंदोलन

By team
On: February 22, 2024 10:33 AM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेशाचे लवकरात लवकर कायद्यात रुपांतर करा अन्यथा मोठं आंदोलन करू, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बुधवारी २१ फेब्रुवारी मराठा समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत त्यांनी सरकारला २२ आणि २३ फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली.

त्यानंतर दररोज गावागावात आंदोलन केलं जाईल, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. आंदोलन करताना कोणीही जाळपोळ करायची नाही. आंदोलनाचा दहावी-बारावीच्या परीक्षांवर परिणाम होता कामा नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!