ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता तेच‎ माझ्यावर टीका करतात ; मंत्री मुंडे बरसले !

बीड : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची जोरदार फिल्डिंग लावणे सुरु असतांना नुकतेच परळी मतदार संघातातील राजकारण तापले आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच विरोधकावर टीकास्त्र सोडले आहे.
मंत्री मुंडे म्हणाले कि, ‘मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार ‎‎बार गिरे, मगर ये ‎‎मुमकिन नही है’, ‎‎मला टार्गेट ‎‎करण्याचा अनेक ‎‎जणांनी प्रयत्न ‎‎केला आहे. ज्या ‎‎नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो, ‎‎त्या नेत्यांनी ही पातळी गाठल्याचे‎ वाईट वाटते, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता शरद‎पवारांवर परळीत टीका केली.‎

परळीत दिव्यांग कल्याण‎विभागाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे‎यांच्यातर्फे, परळी विधानसभा मतदार‎संघातील एक हजार कर्णबधीर‎दिव्यांग बांधवांना, अद्ययावत मशीन‎वाटप कार्यक्रम सोमवारी झाला.‎त्यावेळी मंत्री मुंडे बोलत होते. पुढे‎बोलताना ते म्हणाले की, आम्ही‎ज्यांचा आजही आदर करतो, त्यांना‎आदरयुक्त बोलतो. भलेही आम्ही‎दादांसोबत राहिलो, परंतु कधीही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎व्यक्तिगत टीका आम्ही त्यांच्यावर‎केली नाही. मात्र माझे घर, माझी जात‎यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका‎करावी लागते, याची खंत आहे‎असेही मुंडे म्हणाले. परळी वैजनाथ‎मतदारसंघातील मायबाप जनता सूज्ञ‎आहे. त्यांना माहीत असते की‎आपल्या माणसाला का टार्गेट केले‎जात आहे? कुणी टार्गेट करायचा‎प्रयत्न केला तर त्यांचा टार्गेट कसे‎हाणून पाडायचे हे सुद्धा परळीकरांना‎फार चांगले माहीत आहे, असे म्हणत‎मंत्री मुंडे यांनी नाव न घेता शरद पवार‎यांना इशारा दिला.‎ परळी मतदार संघात आगामी‎विधानसभा निवडणुकीत शरद पवार‎गटाकडून, धनंजय मुंडे यांना टार्गेट‎करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू‎आहेत. परळीत मुंडे विरोधकांची मोट‎बांधण्याची तयारी पवार गटाकडून‎केली जात आहे.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group