मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असून आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला. पाच वर्ष सत्तेची मौजमस्ती करणे आणि देशाची संपत्ती विकणे आणि तिथूनच श्रीमंत होणे, असे काम या लोकांनी केल्याचे पटाले यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जनतेची मत घेऊन त्यांना मोठी स्वप्न दाखवली होती. मात्र ती कधीच पूर्ण करण्याचे काम केले नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
भंडारा येथे एका कंपनीच्या भूमिपूजन सोहळ्यात नाना पटोले यांच्यावर प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली होती. याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले असल्याची घणाघाती टीका देखील पटोले यांनी केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याचा काहीही विकास केला नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. त्यांची विकासाची भूमिका असती तर त्यांनी मला आशीर्वाद दिला असता. पण आता ते कायम भावी राहणार असल्याचे पटाले यांनी म्हटले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर कायम विश्वास दाखवला आहे. मला कायम आशीर्वाद दिला आहे. मात्र भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचे गाजर दाखवून स्वयंभू नेते काम करत आहेत. मात्र आता विकास काय असतो हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला काही महिन्यातच कळणार असल्याचा दावा देखील पटोले यांनी केला आहे.