ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर ; शिंदेंची भाजपवर टीका

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत प्रणिती शिंदेंसाठी प्रयत्न करत होता. मात्र प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या. भाजपमधील दिग्गज नेते सोलापूर लोकसभेसाठी मजबूत उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्नशील होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. मंगळवारी मोहोळ तालुक्यात संकल्प सभेसाठी ते आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदे यांना सोबत घेऊन मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावातील कार्यक्रमात असाच एक गौप्यस्फोट केला होता. मला आणि प्रणितीला भाजपकडून अनेकदा ऑफर होती, असे ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काहीच दिवसांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापुरातूनही सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जातील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आ. प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा करण्याची वेळ आली

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!