---Advertisement---

सोलापुरातील सराईत गुन्हेगार गायकवाड दोन जिल्ह्यातून तडीपार

By team
On: March 20, 2024 2:28 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील काही परिसरात गुंडगिरी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करुन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार शुभम सिध्दाराम गायकवाड (वय २९) याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

त्यास पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर, उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले. परिसरातील लोकांच्या जिवीतास हानी पोहचविणे, अवैधरित्या मटका चालविणे, महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे शुभम सिध्दाराम गायकवाड (रा. सुंदरम नगर, विजापूर रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्यामुळे त्यास १८ मार्च २०२४ रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर तळेगांव दाभाडे, चाकण रोड, पुणे येथे सोडण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!