ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात ; जरांगे पाटलांची टीका

नांदेड : वृत्तसंस्था

मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहे. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी महाराष्ट्रात संवाद दौरा सुरू केला आहे. सोमवारी ता.४ रात्री नांदेड येथे मराठा बांधवाना संबोधित करताना जरांगेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा दिला आहे.

कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली त्याचा कार्यक्रम करतोच मी…’ असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर उत्तर देताना, मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे.

“सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले सगेसोयऱ्यांचा शब्द देऊन अधिसूचना काढली, पण त्याचे कायद्यात रुपांतर केले नाही. विशेष अधिवेशनात मराठा नेत्यांनी यावर एकही शब्द काढला नाही. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं आहे, ते कोर्टात टिकणार नाही”, असंही जरांगे म्हणाले.

“२०१८ साली मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यावेळेस जसं झालं, तसं आता देखील होईल.ओबीसीमधून आरक्षण मिळाले, तर केंद्र आणि राज्यात मराठा समाजाचे पोर नोकरीला लागतील”, असं म्हणत जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांचे कान फुंकत असून त्यांना जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला लावत आहेत. पण कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तर माघारी हटू नका. तोंडाजवळ खास आला आहे, सोडू नका, असं आवाहन देखील जरांगेंनी मराठा बांधवांना केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!