ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माल वाहतुक वाहनांच्या अपघातात एक ठार !

परभणी : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील ताडकळस येथील पिंगळघड नाल्यावर रात्रीच्या सुमारास दाेन माल वाहतुक वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल होवून पुढील तपास सुरु आहे

मिळालेल्या माहितीनूसार पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे काल रात्री नऊच्या सुमारास पूर्णा येथून ताडकळसकडे येणारे एक माल वाहतुकीचे वाहन आणि ताडकळसहून पूर्णाला जाणाऱ्या दुस-या माल वाहतुकीच्या वाहनाची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण हाेती की दाेन्ही गाड्यांचे माेठे नुकसान झाले. या घटनेत एका माल वाहतुकीच्या गाडीचे चालक विजय रावसाहेब मुस्तापुरे (वय 48, राहणार कोनेरवाडी तालुका पालम) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेतील जखमींना परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. ताडकळस पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!