ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…फक्त पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या बँकांचे कर्ज ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कर्जमाफीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेचा नायनाट झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी याआधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र काही माध्यमांत आणि राजकीय वर्तुळांमध्ये, ही कर्जमाफी कुठल्या बँकेकडून घेतलेल्या कर्जावर लागू होणार नाही याबाबत वेगवेगळे दावे होऊ लागले होते.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, “मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात – कुणी म्हणतो राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचे होणार नाही, कुणी म्हणतो या सोसायटीचे होणार नाही. पण सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेने दिलेले कर्ज २ लाख रुपयांपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.” मुख्यमंत्र्यांनी यावर भर देत सांगितले की, “केवळ आमचा प्रयत्न हा आहे की माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. आम्ही ३० जूनच्या आधी ही कर्जमाफी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबतही माहिती दिली. त्यांनी दावा केला की, हा प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून निधी मिळाला, मात्र विदर्भाची बाजू दुर्लक्षित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “हा प्रकल्प आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पात समावेश केला आहे. त्यामुळे विदर्भाचे जलसंपन्नतेचे चित्र पूर्णपणे बदलेल.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!