ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन

अक्कलकोट,दि.६ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुला मुलींची २८ वी ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा दि. ८ ते १० फेब्रुवारी २o२३ अखेर येेथील राजे फत्तेसिंह मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ बुधवारी दुपारी ४ वाजता आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते संपन्न होईल.कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे भुषवतील तर प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेचे उपसंचालक अनिल चोरमले, तर प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे राज्याचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर ,जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर , डीवायएसपी राजेंद्रसिंह गौर, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, महेश स्वामी, मुख्याधिकारी सचिन पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते व सहाय्यक पोलीस अधीक्षक हेमंतराव जाधव व सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सचिन किरनळी, डॉ.नंदा शिवगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुले व मुली असे एकूण ६० संघातून एकूण ८०० खेळाडू ,पंच, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा साखळी व बाद पद्धतीचे होणार आहेत. देवस्थानच्या वतीने खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!