ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षणमहर्षी स्वर्गीय चनबसप्पा खेडगी यांच्या १०२ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

अक्कलकोट – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, दानशूर व शिक्षणमहर्षी स्वर्गीय चनबसप्पा खेडगी यांच्या १०२ व्या जयंती निमित्त उद्या बुधवार दिनांक : ०६/१०/२०२१ सकाळी ९ ; ३० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उदघाटन दिवाणी न्यायाधीश बाळासाहेब श्रीपतराव गायकवाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा शोभाताई खेडगी या उपस्थित राहणार आहेत..

यावेळी माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, संस्थेचे सचिव सुभाष धरणे, व्हा. चेअरमन अशोक हारकूड, संचालक अडव्होकेट अनिल मंगरुळे, सिद्धाराम बि-हाडे, पवित्रा खेडगी, सुभद्रा साठे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी,  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सी. बी. खेडगी यांच्या जयंती दिनी रक्तदान शिबीर कार्यक्रम सी. बी. खेडगी महाविद्यालय व हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून हे शिबिर होत आहे. शहरातील विविध व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग अपेक्षित आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत हे शिबिर चालेल. तरी सर्वांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांनी केले आहे.  

तरी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय फुलारी, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, रक्तदान शिबीर समन्वयक डॉ. शिवराया अडवितोट समन्वयक ,डॉ. शंकरराव धडके, प्रा. विलास अंधारे यांनी केले आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय परिवारातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

सामाजिक जबाबदारी

रक्तदान हे जीवदानाचे पुण्यकर्म असून सामाजिक बांधिलकी ठेवून या चळवळीत भाग घेऊन रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. आपल्या शरिरात साधारणपणे ५ ते ७ लिटर रक्त असते. ३५० मि.ली एवढेच रक्त घेतले जाते. त्या अवघ्या २४ ते ४८ तासांत शरिरात रक्तनिर्मिती होते. रक्तदानामुळे आपल्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते. आणि पुन्हा नवे रक्त निर्माण होते. ही एक आरोग्यदायी चळवळ आहे – डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, प्राचार्य

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!