---Advertisement---

सच्चा कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसला अच्छे दिन येतील : म्हेत्रे, काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाला प्रारंभ

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.४ : काँग्रेसचे कार्यकर्ते कट्टर आहेत त्यांच्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येतील,याचा मला
विश्वास आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसतर्फे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ अक्कलकोट मतदारसंघातील गावांमध्ये करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते – पाटील यांची निवड झाली आहे यामुळे पक्षाला निश्चितच फायदा होईल.पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागावे,असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, दक्षिण तालुकाध्यक्ष हरीश पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष शाईन शेख यांची उपस्थिती होती.

कासेगाव, बोरामणी,धोत्री,कुंभारी या चार पंचायत गणनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला होता. सदर गावांमध्ये बूथ कमिट्या स्थापन करून त्या मजबूत करण्याचे व जबाबदारी घेऊन काम करण्याचे आवाहन डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

जिल्हयात काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने हा दौरा सुरू करण्यात आला आहे. जिल्हयात सर्वत्र हा दौरा होईल, असे जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!