अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांनी अॅड. परवेज कुरनुरकर यांच्या ए-वन अक्कलकोट येथील निवास स्थानी सदिच्छा भेट दिली.पद्मश्री अॅड. उज्वल निकम हे अॅड. राजेश कांबळे खुन खटल्यामध्ये महाराष्ट्र शासन कडून विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. या केसची सुनावणीसाठी ते सोलापूर येथे आले होते. कोर्ट कामकाज संपवून त्यांनी तुळजापूर व अक्कलकोट येथे मंदीर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अॅड. परवेज कुरनुरकर यांच्या ए-वन चौक, अक्कलकोट येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अॅड. कुरनुरकर यांच्या सोबत कायद्याच्या क्षेत्राबाबत चर्चा केली.
यावेळी अॅड. निकम यांनी चालविलेल्या मोठ-मोठ्या केसमधील त्यांचे अनुभव सांगितले. अॅड. निकम यांनी सांगितले की, कायद्याच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी व मेहनत यांची खूप गरज आहे,यावेळी हाजी बाशा कुरनुरकर, नवाज़ कुरनुरकर, निज़ामुद्दीन कुरनुरकर, विपुल दोशी, सरफराज मुर्शद, जिशान मुर्शद, समीर मुल्ला, खाजप्पा आयवळे उपस्थित होते.