ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शुक्रवारी अक्कलकोट येथे स्वामी नरेंद्र महाराजांचा पादुका दर्शन सोहळा !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पूर्वनियोजित पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम येत्या ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राजे फत्तेसिंह क्रीडांगण अक्कलकोट येथे आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला संपूर्ण सोलापूर जिल्हयातून हजारो भाविक भक्तांची गर्दी होणार आहे.या दिवशी सकाळी ९ वाजता जगद्‌गुरुश्रीच्या सिद्ध पादुकांची सवाद्य विविध पथकासह भव्य मिरवणुकीनंतर संत पिठावर आगमन होणार आहे.

गुरुपूजन, आरती, प्रवचन, उपासक दीक्षा दर्शन व पुष्पवृष्ट, सामाजिक उपक्रमांतर्गत अॅम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा, असा एक दिवसाचा जगद्‌गुरु श्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम होत आहे. दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे.भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या ऑनलाइन अमृतवाणीचा तसेच पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्व स्वरूप संप्रदाय सोलापूर जिल्हा भक्तसेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.जगगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेकडून अनेक लोक उपयोगी उपक्रम राबविले जातात. गोरगरीब विद्याथ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य दिले जातात.संस्थेच्यावतीने ५२ अॅम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीजधाम येथे २४ तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे. गोर गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खाते औषधे शेती अवजारे वाटप केली जातात. दुष्काळ पडल्यास संस्थांच्या वतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो.अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम अंतर्गत अंगार,दोरे यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते.दुर्बल घटक मदत उपक्रम निराधार महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, शेळ्या, मेंढ्या, दूपत्या गाई व म्हशीचे वाटप केले जाते,असे अक्कलकोट तालुकाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!