---Advertisement---

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघात रासप भाजपासमवेत – रासप जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप मिञपक्ष महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष पुर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे मत रासपचे जिल्हा अध्यक्ष सुनिल दादा बंडगर यांनी केले आहे.

बुधवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार माजी मंत्री महादेव जानकर हे मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हुलजंती महालिंगराया यांचे दर्शन घेऊन रासपच्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की,आपण महायुतीसोबत आहोत.त्यामुळे रासपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी समाधान अवताडे यांना विजयी करण्यासाठी जिवाचे रान करावे असे आवाहन केले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीवरुन महादेव जानकर हे मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन रासपच्या टीमला कामाला लागा असे आदेश देऊन गेले.

काल एका दैनिकात रासपच्या माजी तालुका अध्यक्ष यांनी शैला गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे आवाहन केले आहे. रासपने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नसून जे कोणी पाठिंबा दिला आहे. त्यांना यापुर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांनी रासपच्या नावाने आपली झोळी भरु नये.व रासपची बदनामी करु नये असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी केले आहे..

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!