पंढरपूर, दि.२ : सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.परंतु भाजपने या ठिकाणी राष्ट्रवादीला धूळ चारत ‘दे धक्का’ दिला आहे. या ठिकाणी भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी सहानुभूतीची लाट असूनही भगीरथ भालके हे विजयी होऊ शकले नाहीत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष त्यांच्याबरोबर असूनही त्यांचा विजय होऊ शकला नाही.मागच्या निवडणुकीतही समाधान अवताडे यांनी खूप प्रयत्न केले
होते परंतु त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते.यावेळी मात्र भाजपने आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने अवताडे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचा काटा काढला आणि त्याठिकाणी समाधान आवताडे
यांच्या विजयाने कमळ फुलविले.त्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यासाठी खासदार निंबाळकर यांनी
मोठे प्रयत्न केले होते.राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.त्याशिवाय
देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे.मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे
ती पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची. येथील पोटनिवडणुकीत भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाली होती.महाविकास आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले,टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे,नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने त्याठिकाणी नाकारले.
पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच” असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.यात ३५ गावांच्या पाण्याचा मुद्दा महत्वाचा ठरला.त्याशिवाय, राज्यातील कोरोनाच्या संकटाची हाताळणी हा मुद्दा भाजपाकडून मोठा करण्यात आला होता.
रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींचा तुटवडा आणि पुरवठा या मुद्द्यांवरून दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभे होते.यात भाजपने बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.