---Advertisement---

पंढरपूरमध्ये भाजपचा विजय म्हणजे महाविकास आघाडीवर असलेला जनतेचा रोष आहे,भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us:
---Advertisement---

 

 

मुंबई, दि.२ : पंढरपूरमध्ये झालेल्या भाजपच्या समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राज्य पातळीवरून भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे.ती म्हणजे पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीवर तेथील मतदारांनी या निमित्ताने रोष व्यक्त केला आहे.भालके यांना सहानुभूती मिळाली म्हणून त्यांना एवढी तरी मते मिळाली दुसरीकडे निवडणूक असती तर भाजपने वन वे विजय मिळवला असता,असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. पाटील पुढे म्हणाले की, भालके यांच्या बाजूने सहानुभूती होती मात्र महा विकासआघाडीवर मतदारांचा रोष होता हे वास्तव आहे. न मिळणारा पिक विमा, कोरोनातील निष्काळजीपणा, वाढीव वीज बिले यामुळे सरकारवर मतदारांचा रोष होता तो इथे खऱ्या अर्थाने व्यक्त झाला आहे, असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!