ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पवारांना आता छत्रपती आठवले ; राज ठाकरेंचा निशाणा

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहे. तर नुकतेच शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिल्याने राज्यभर कार्यकर्ते जल्लोष करीत आहे. तर आता राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाचे शनिवारी रायगडावर लाँचिंग करण्यात आले. पत्रकारांनी याविषयी राज ठाकरे यांना छेडले असता त्यांनी शरद पवार यांना शाब्दिक टोले लगावले.

राज ठाकरे म्हणाले कि, शरद पवार यांनी आतापर्यंत केव्हाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही. पण आता संकट काळात त्यांना छत्रपती आठवत आहेत. त्यांना आज रायगडाची आठवण झाली. आतापर्यंत त्यांना शिवरायांचे नाव घेतल्यास मुस्लिमांचे मते मिळणार नाहीत, असे वाटत होते, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.

तुतारी चिन्ह मिळाले तर आता ती फुंका. मी काय करू त्याचे? तुम्हाला आठवत असेल तर मी एका मुलाखतीत शरद पवार यांना तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही असा प्रश्न केला होता. त्यावर त्यांनी मौन साधले होते. कारण शिवछत्रपतींचे नाव घेतले तर मुस्लिमांची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी एवढी वर्षे काढली. आता त्यांना रायगड आठवला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

सद्यस्थितीत महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरु असल्याचे मतही राच ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. पुण्यात काही दिवसांपूर्वी 100 व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले. मी त्यांना तुम्ही कोणत्या गटाचे असा प्रश्न केला. त्यावर 23-3 जणांनी आपण शरद पवार गटाचे असल्याचे सांगितले. तर उर्वरित सर्वांनी आपण अजित पवार गटाचे असल्याचे सांगितले. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहीजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल, असे राज ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!