ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूरचे लोकनेते ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान गरिबांसाठी आधारवड

पुण्यतिथी कार्यक्रमात ११० जणांचे रक्तदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लोकनेते स्वर्गीय ब्रम्हानंद मोरे प्रतिष्ठानने मागच्या २५ वर्षात दीनदलित,गोर -गरीब वंचित आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी मोठे काम केले आहे हे प्रतिष्ठान गरिबांसाठी आधारवड बनले आहे,असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी केले.

शुक्रवारी,अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एड. शरदराव फुटाणे हे होते.

जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना मालोजीराजे भोसले म्हणाले, मागच्या अनेक वर्षांपासून मी मोरे प्रतिष्ठानच्या कार्याला जवळून पाहतो. दरवेळी ते समाजाच्या विकासासाठी काही ना काही करत असतात हे कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवावे आणि गरिबांचे अश्रू या निमित्ताने पुसले जावे. आरोग्य शिबिर व रक्तदान बिराच्या माध्यमातून जनतेची सेवा सुरू असल्याबद्दल प्रतिष्ठानच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाचे प्रमुख मंगेश शेवटी यांना डॉ. द्वारकानाथ कोटणीस आरोग्य सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.पुढे बोलताना चिवटे म्हणाले,प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी आत्तापर्यंत आरोग्य सेवेच्या बाबतीत खूप चांगले काम केलेले आहे.ते खरे आरोग्य मित्र आहेत.आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक गरीब रुग्णांना आधार देण्याचे काम केले आहे दरवर्षी प्रतिष्ठान तर्फे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात या उपक्रमाबद्दल ही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना फुटाणे म्हणाले की, मरावे परी कीर्तिरूपे उरावे असे कार्य स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांनी केले आहे. त्यामुळेच त्यांच्या या प्रतिष्ठानच्या कार्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे.मोरे कुटुंबीयांनी देखील सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन हे कार्य पुढे चालू ठेवले आहे.त्यांचे कार्य अनुकरणी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले.यावेळी दोडयाळ येथील प्रगतशील शेतकरी शिवलिंगाप्पा चौलगी ( यशवंतराव चव्हाण आदर्श शेतकरी ) श्रीमती शकुंतला जाधव, सोलापूर (राष्ट्रमाता जिजाऊ महिला सेवा ) शतकवीर रक्तदाते अभिजीत लोके (महात्मा बसवेश्वर शतकवीर रक्तदाता व आदर्श शिक्षक ), शिवशरण जवळगे ( स्व.आमदार बाबासाहेब तानवडे सिंचनसमृद्धी ) , पत्रकार स्वामीराव गायकवाड ( सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले लोकाभिमुख पत्रकार ) ,सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके ( राष्ट्रसंत तुकाराम महाराज समाजसेवा ) या मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.संचारचे पत्रकार मारुती बावडे यांना अक्कलकोट भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे,जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे, ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे,तुकाराम बिराजदर,विजय तानवडे,मोहन चव्हाण,संजय मोरे,राजू मोरे,विनोद मोरे,प्रमोद मोरे,मोहन शिंदे ,रानबा काळे,किशोर काळे,महेश मोरे,बाबासाहेब मोरे,परशुराम बेडगे,तुकाराम जावीर,भीम मोरे,डॉ.रणजित शिंदे,बाबासाहेब शिंदे,राहुल बावडे,सचिन पवार,अप्पा खांडेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.प्रारंभी सकाळी पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ११० जणांनी रक्तदान केले.याचे उद्घाटन प.प प्रभूशांत महास्वामीजी विरक्त मठ,हत्तीकणबस यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामीराव पाटील हे होते.यावेळी आदर्श शिक्षक म्ह्णून सुरेश माने यांना पुरस्कार देण्यात आला.यावेळी गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.शिबिरासाठी सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

किर्तन सोहळ्याला महिलांचा प्रतिसाद
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.पशिवलीलाताई पाटील बार्शीकर यांचे भव्य कीर्तन झाले.या कीर्तन सोहळयाला महिला वर्गांनी मोठा प्रतिसाद दिला.या कीर्तन सोहळ्यात त्यांनी अध्यात्म आणि समाज प्रबोधनावर भर दिला.पाटील यांच्या कीर्तन सोहळ्याने कुरनूर परिसरातील भाविक मंत्रमुग्ध झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!