---Advertisement---

खळबळजनक : पोलीस चौकीतच शिपायाने गोळी झाडून संपविले

By team
On: April 6, 2024 10:23 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भरत अस्मार खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहियानगर पोलीस चौकीत ते गुरुवारी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. मध्यरात्री ते आराम करण्यासाठी पोलीस चौकीतील खोलीत गेले. पहाटेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीत गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्मार यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!