ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पारंपारिक वाद्य आणि वेशभूषेतील कलाकारांनी वेधले लक्ष

अक्कलकोट मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाची मिरवणूक उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पारंपरिक वाद्य, विविध वेशभूषातील कलाकार,मुलींच्या मल्लखांब संघाने केलेल्या लक्षवेधी कसरतींमुळे श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची शिवजयंतीची मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली. हजारोंच्या उपस्थित वाद्यवृंदाच्या निनादात शिवछत्रपती चौक बसस्थानकासमोरून ही मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीने शहरात आगळे वेगळे स्थान निर्माण केले. गुरुवारी, सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री स्वामी समर्थ देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

साधारण चार ते पाच तास ही मिरवणूक चालली.याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, उद्योजक वरुण शेळके, बाबासाहेब निंबाळकर, अतुल जाधव, राम जाधव, रवीना राठोड,बाळासाहेब मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.या मिरवणूकीमध्ये कराड येथील मर्दानी खेळ,सातारा येथील मल्लखांब,केरळमधील पारंपरिक वाद्य संघ,वेशभूषा कलाकार यांनी आपले प्रेक्षणीय खेळ सादर केले.

मुलींच्या मल्लखांब संघाने अत्यंत प्रेक्षणीय कसरती सादर केले. ही मिरवणूक कारंजा चौक, मेन रोड,फत्तेसिंह चौक या मार्गाने काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक व महिलांनी लक्षवेधी कसरत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी अध्यक्ष झाकीर तांबोळी, उपाध्यक्ष ओंकार कांबळे, प्रकाश गायकवाड, वैजनाथ मुकडे, सुहास सुरवसे, अनिल मोरे,स्वामीनाथ लोणारी, भीमा कोळी, प्रशांत विटकर, प्रज्वल पाटोळे,विवेक जाधव,दादा शिंदे, अप्पू किणगी,सोनू सुरवसे उपस्थित होते.१९९२ पासून या मंडळाला मोठी परंपरा आहे. तेव्हापासून आज तागायत या मंडळाने विविध उपक्रमाची परंपरा जोपासली आहे. हा उत्सव लोकोत्सव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,असे वरूण शेळके यांनी सांगितले.

मिरवणुकी दरम्यान चार सीसीटीव्ही कॅमेरे
मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाने यावर्षी अनोखा पायंडा पडत त्यांनी आपल्या स्वतःच्या मिरवणुकीमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे लावून पोलिसांना सहकार्य केले आहे.मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मिरवणूक नियोजनबद्ध वेळेत काढण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली तर मंडळांना अनोखा संदेश दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!