ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ दिवसानंतर पेट्रोलचे दर कमी होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत

नवी दिल्ली: देशातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. पेट्रोल-डीझेलच्या दरासह गँसच्या दराने आज उच्चांक गाठले आहे. वाढत्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमुळे देशात नाराजीचे सूर आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारातही दिसत आहे. दरम्यान पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतीवर भाष्य केले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतात पेट्रोल-डीझेलचे दर वाढले. हिवाळा गेल्यानंतर पेट्रोलचे किंमत कमी होतील असे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे.

मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गँस सिलेंडरच्या आज मोठी वाढ झाली आहे. २५ रुपयांची वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!