नवी दिल्ली वृत्तसंस्था
आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांवर महायुतीने निर्णायक आघाडी घेतली आहेत. तर राज्यात १३० जागांवर भारतीय जनता पक्षाने एकहाती पक्कड घेतली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पीएम मोदी यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील विजय हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे”. तसेच आपण एकात्मतेची उंची आणखी उंच करू असे आवहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो. जय महाराष्ट्र!, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.