ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून येणार : हॉलीवूड अभिनेत्री केले कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी आणि अमेरिका व आफ्रिकन देशांतील संबंधांसाठी ‘सर्वात चांगले नेते’ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री व गायिका मेरी मिलबेन यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदी विजयाच्या मार्गावर असून त्यांना पुन्हा निवडून येताना पाहण्यास अमेरिकेतील अनेक लोक इच्छुक असल्याचा दावाही या लोकप्रिय आफ्रिकन-अमेरिकन सेलिब्रिटीने केला.

देशात लोकसभा निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच अमेरिकेतील आफ्रिकीवंशीय हॉलीवूड अभिनेत्री व प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. संपूर्ण भारताला माहिती आहे की मी मोदींची मोठी समर्थक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अमेरिका व आफ्रिका या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध मजबूत झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात चांगले नेते असल्याचे गौरवोद्‌गार ४१ वर्षीय मिलबेन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काढले. येत्या काळातही हे संबंध आणखी नवी उंची गाठण्यासाठी मोदींना पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकताना पाहण्यासाठी अमेरिकेतील अनेक लोक इच्छुक असल्याचे त्या म्हणाल्या. अमेरिकेत मोदींना उल्लेखनीय समर्थन असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयाच्या मार्गावर असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदींनी भारताला जगातील खरी आर्थिक शक्ती बनविण्यासाठी असामान्य पाऊले उचलली आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या त्यांच्या धोरणांनी महिलांच्या नेतृत्वांना प्रोत्साहन दिले आहे. भारताप्रमाणे अमेरिकेतही निवडणुकीची तयारी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीचा हंगाम अमेरिका, भारत आणि जगासाठी सर्वात महत्त्वाचा हंगाम ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, मिलबेन यांनी यापूर्वी राष्ट्रगीत ‘जन गण मन’ तसेच ‘ओम जय जगदीश हरे’ यासारखे हिंदी गीत आपल्या विशेष शैलीत गायले होते. त्यामुळे भारतातही त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली. मोदींच्या चाहत्या असलेल्या मिलबेन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!