ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सहकुटुंब पंतप्रधानांची भेट; काय आहे भेटीचे कारण … ! जाणून सविस्तर

 

दिल्ली,दि.२२ : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज सहकुटुंब दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू रूद्रांश यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकास योजना, प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याची ग्वाही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिली तसेच बचाव कार्य आणि पुनर्वसनाबाबतदेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा असे निर्देश देतानाच पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचनाही प्रधानमंत्र्यांनी केली.

वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावरही पंतप्रधानांनी आस्थेवाईकपणे चर्चा केली. कोकणात भरपूर पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटरग्रीड या राज्य सरकारच्या योजनेचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी चर्चा केली

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!