---Advertisement---

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे अविरोध; सुरवसे सरचिटणीस, कामतकर खजिनदार

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे आणि खजिनदारपदी विनोद कामतकर यांची निवड करण्यात आली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी मावळते सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मावळते खजिनदार शरीफ सय्यद यांनी वार्षिक जमा- खर्च सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी सूचना मांडली तर त्यास विनोद कामतकर यांनी अनुमोदन दिले. विक्रम खेलबुडे यांनी अध्यक्षपदाची दशकपूर्ती करत अकराव्यांदा पद भूषवत इतिहास घडविला. तर सरचिटणीस पदावर सागर सुरवसे व विनोद कामतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावर्षीचे नूतन पदाधिकारी व कार्यकारणी पुढील प्रमाणे-: उपाध्यक्ष-विठ्ठल खेळगी, तात्या लांडगे, विजय गायकवाड, संजय पवार, सचिन गाडेकर. चिटणीस-संगमेश जेऊरे, गौतम गायकवाड, अफताब शेख. सहचिटणीस-धनंजय मोरे.

कार्यकारिणी सदस्य- अप्पासाहेब गंचीनगोटे, दीपक दुपारगुडे, अजित संगवे, विक्रांत कालेकर, कालिदास माशाळ, वेणूगोपाल गाडी, रणजीत जोशी, विजयकुमार राजापुरे, विकास कस्तुरे, मुजम्मिल शाहनुरकर, रतन बनसोडे, रामदास काटकर, रोहन श्रीराम, सचिन जाधव, वेंकटेश दो‌ंता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!