---Advertisement---

पोहरादेवीतील संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन भोवणार; महंतांसह अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह

On: February 25, 2021 1:32 PM
Follow Us:
---Advertisement---

वाशिम : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या 15 दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड दोन दिवसांपूर्वी प्रथमच समोर आले. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या शक्तीप्रदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. हजारोंची घर्दी असल्याने हे प्रकरण मंत्री राठोड यांचे चांगलेच अंगलट येणार आहे. पोहरादेवी येथील एका महंतांसह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळ‍ून आले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच गावातील इतर 3 मिळून एकूण 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचेही बोलले जात आहे.

संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्यांना आवडलेले नाही. त्यानी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर वर्षा येथे झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गर्दीवरून शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता सरकारवर दबाव देखील येऊ लागला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!