नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचा फिरोजाबादचा असणार्या या तरुणाने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर फोन करुन ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्या नंतर पोलिसांनी सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात केले होते.
त्यानंतर तपासादरम्यान ही अफवा असल्याचं समोर आलं. आज सकाळी ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्या अज्ञात फोनमुळे सुरक्षा खडबडून जागी झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेनं सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, फेक कॉल प्रकरणात फिरोजाबादच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.