कुरनूर : प्रतिनिधी
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण चनबसप्पा खेडगी यांच्या दुतीय पुण्यस्मरण निमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवशरण अक्कलकोट भूषण पुरस्काराचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावर्षी दिला जाणारा उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक पुरस्कार कुरनूर गावचे सुपुत्र तथा श्री दत्त कंट्रक्शन चे सर्वेसर्वा प्रमोद मोरे यांना देऊन सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट उद्योग व्यवसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना शिवशरण अक्कलकोट भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले असून हा कार्यक्रम अक्कलकोट येथील सी.बी.खेडगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. प्रमोद मोरे यांनी श्री दत्त कंट्रक्शन च्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये चांगले वलय निर्माण केले आहे त्याचबरोबर सामाजिक कार्याची सुद्धा त्यांना प्रचंड आवड आहे स्व. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. केवळ कुरनूर गावातच नव्हे तर संपूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांच्या प्रतिष्ठानचे कार्य हे बहुमूल्य आहे विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे तसेच आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम भरारी घेतली आहे त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना प्रमोद मोरे म्हणाले की शासनाचे सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत आणि ती दर्जेदार करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत तसेच ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणुसकी हा सर्वात मोठा धर्म समजून आम्ही मोरे कुटुंबीय जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलो आहोत यापुढे देखील सामाजिक कार्य असेच ठेवू आणि हा पुरस्कार लोकसेवेसाठी अर्पण करतो असे म्हणाले. यावेळी संस्थेचे चेअरमन बसलींगप्पा खडगी, प्राचार्य अडवितोटे,माजी खासदार डॉ.जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, शिवबसव राजेंद्र महास्वामीजी, जयगुरुशांत लिंगराअध्य शिवाचार्य महास्वामी, बसवलिंग महास्वामीजी, शिवलिंग महास्वामीजी, प्रभूशांती लिंगेश्वर महास्वामीजी यांच्यासह इतर मान्यवरांच्या सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.