---Advertisement---

आता मुख्यमंत्र्यांनी दिले बुलडोजर कारवाईचे आदेश

By team
On: June 26, 2024 10:45 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते त्याच पुण्यात आता फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यातच पुणे पोर्श कार अपघातानंतर पुण्यातील बार आणि पबवर लोकांच प्रचंड रोष वाढला आहे. यामुळे पब संस्कृतीवर चहुबाजूंनी टीका होत आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून शहरातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

अमली पदार्थांशी संबंधित असेलल्या पबचे बेकायदेशीर बांधकाम बुलडोझरचा वापर करून पाडण्याचे आणि पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर बनविण्यासाठी नव्याने कारवाई सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याला अमलीपदार्थ मुक्त शहर बनविण्यासाठी अनधिकृत पबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थाशी निगडित असलेल्या पबवरील अनधिकृत बांधकाम बुलडोजरने पाडावे, असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आले आहेत.”
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमधील प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मध्यरात्रीनंतर पब सुरू असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. पबमालकासह, चालक, व्यवस्थापकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!