अक्कलकोट,दि.१६ : दुधनी (ता.अक्कलकोट) येथे मागील आठवड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता.त्यामध्ये अनेक कुटूंब,बाजारपेठ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.ही बाब लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते २०१ कुटूंबांना १६ प्रकारचे विविध गृहोपयोगी साहित्यांच्या किटचे वाटप करण्यात आले.व्यासपीठावर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, सभापती प्रथमेश म्हेत्रे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी,चंद्रकांत येगदी, राजशेखर दोशी,प्रशांत लोणी,गुरूशांत ढंगे,रामा गद्दी,राजू चव्हाण,गुरु हबशी,लोकेश राठोड,शोएब तडमुड,शंकर भांजी,सातलिंगप्पा परमशेट्टी,बसवराज हौदे,शिवराज गुळगोंडा,शिवशरण हबशी,शरणगौड पाटील, विश्वनाथ हडलगी,अशोक पादी आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले की,सध्याच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.तरुणांनी जबाबदारी ओळखून आपली वाटचाल निश्चित केल्यास देशाची प्रगती नक्की होईल.वाढदिवशी संकटातील कुटूंबांना किराणा किटचे वाटप करून प्रथमेश म्हेत्रे मित्र परिवाराने खऱ्या अर्थाने समाजसेवा केल्याचे म्हेत्रे यांनी नमूद केले.स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या विचारधारेला अनुसरून तरुणपिढीची वाटचाल ही निश्चितच गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दुधनीतील व्यापारी असोसिएशन,मार्केट कमिटी, मातोश्री लक्ष्मीबाई प्रशाला,शांभवी फाऊंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्याणी करडे यांनी केले.