---Advertisement---

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सुफी संत शेख निरुद्दीन चिश्ती यांना साकडे

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२७ :
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा टेस्ट कोरोना पॉजिटिव आल्याने अक्कलकोट शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने थोर सूफी संत शेख नुरूद्दीन चिश्ती यांना चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कोरोना टेस्टिंग रिपोर्ट काल पॉजिटिव्ह आल्याने अक्कलकोट शहरासह तालुका तथा जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते तथा म्हेत्रे समर्थकांत चींतेची लाट पसरली.सर्वच स्थरातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पृकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडे घालण्यास सुरुवात झाली.

सततचा जनसंपर्क,प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामासाठी खुद्द हजर राहून काम तडिस नेण्याची जिद्द आणि अक्कलकोट तालुक्याच्या विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयातील विविध खात्याच्या येरझाऱ्या यामुळे सिद्धाराम म्हेत्रे हे कोरोना पॉजिटिव्ह आल्याने अक्कलकोट शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने आज युवा शहर अध्यक्ष मुबारक कोरबु यांनी शहरातील शेख नुरूद्दीन चिश्ती रहमतउल्लाह यांच्या मजारीवर फुलांची चादर अर्पण करून म्हेत्रे यांच्या पृकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी या चादर अर्पण कार्यक्रमा प्रसंगी संयोजक मुबारक कोरबू अध्यक्ष युवक काँग्रेस ,विश्वनाथ हडलगी, शहराध्यक्ष भीमा कापसे बसवराज अल्लोळीं,गुरु म्हेत्रे,राहुल भकरे, असलम कोरबू, रमेश चव्हाण, बाळासाहेब खैराटकर ,महादेव चुंगी, सतीश चिंचोली, लालसिंग राठोड, विकी कोरे,नूर कोरबू, नूर नाईकवाडी, सुभान शेख यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते तथा सिद्धाराम म्हेत्रे समर्थक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!