ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदी सिंधुदुर्गात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. पुतळ्याचे अनावर केल्यानंतर त्यांनी आर्ट गॅलरीची देखील पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधान सिंधुदुर्गात नौदल दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तारकर्ली बीचवर नौदलाच्या प्रदर्शनातही ते सहभागी होणार आहेत.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये नौदलाची जहाजे, पाणबुड्या आणि विमानांच्या ऑपरेशनल कामगिरीचा समावेश होतो. सामान्य लोकांनाही त्यात सहभागी होण्याची मुभा आहे, जेणेकरून त्यांना नौदलाच्या अधिकारांची माहिती मिळू शकेल. वास्तविक, सिंधुदुर्गात नौदल दिन 2023 साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाला आदरांजली वाहिली जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तब्बल 43 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून नौदलाने या पुतळ्याची उभारणी केली आहे. त्यामुळेच आज नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्याचे काम सुरू होते. अखेर आज पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!