ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींचा अ‍ॅक्सन प्लॅन तयार : १०० दिवसात घेणार निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली असून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापूर्वी मोदी 3.0 सरकारचा शंभर दिवसांचा अ‍ॅक्सन प्लॅन तयार केला होता. त्याचा उल्लेख त्यांनी काही ठिकाणी केला होता. आता मोदी कॅबिनट या 100 दिवसांच्या अ‍ॅक्सन प्लॅनला अंतिम रुप देत आहे. मोदी 3.0 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, यामुळे निर्णय घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी सहकारी पक्षांशी चर्चा करणार आहे. परंतु या 100 दिवसांत मोठा निर्णय होणार आहे.

मोदी सरकारच्या काळात निर्गुंतवणुकीत अजून आघाडी मिळाली नाही. आतापर्यंत सरकारला फारसे यश मिळालेले नाही. पण आता मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत आपल्या अजेंड्याअंतर्गत काही मोठी पावले उचणार आहे. या 100 दिवसांत काय होणार याविषयी आता अंदाज लावला जात आहे. वरिष्ठ सूत्रांकडून मिळाल्या बातम्यांनुसार, सरकार आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील आपला वाटा कमी करणार आहे.

सरकार पहिल्या 100 दिवसांत निर्गुंतवणुकीवर जोर देणार आहे. सरकारच्या यादीत प्रामुख्याने आयडीबीआय बँक, शिपिंग कॉरपोरेशन आहेत. मागील वर्ष निवडणुकीचे वर्ष होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय थंड बस्तात टाकला होता. परंतु आता सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारचा 63.75 टक्के वाटा आहे. तसेच आयडीबीआई बँकेची (IDBI Bank) निर्गुंतवणूक प्रक्रिया दीर्घ काळापासून थांबली आहे. या बँकेत सरकारचा 49.29 टक्के तर 45.48 टक्के वाटा एलआयसीचा आहे. सरकार आयडीबीआय बँकेतील आपला पूर्ण वाटा विकायचा आहे.

सरकारच्या यादीत NMDC स्टील लि., BEML आणि एचएलएल लाइफकेयर हे सर्वाजनिक उपक्रमसुद्धा आहेत. यापूर्वी 2022 मध्ये सरकारने एअर इंडिया (Air India) आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (एनआयएनएल) मधील आपली हिस्सेदारी विकली होती. शेअर बाजारात शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियाची कामगिरी चांगली होत आहे. मागील महिन्याभरात या शेअरच्या किमतीत 19 टक्ते तर वर्षभरात 134 टक्के वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!