---Advertisement---

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व कोवीड योद्ध्यांना आता मोफत विमा कवच पुरवले जाणार आहे. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी मोदींनी संवाद साधला. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली.

कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले. एवढेच नाही तर अनेकांनी रुग्णसेवा करताना आपले प्राणही गमावले. अशा सर्व डॉक्टरांना आदरांजली वाहत पंतप्रधान मोदींनी आता कोवीड योद्ध्यांसाठी मोफत विमा कवच देण्याची घोषणा केली.

यावेळी कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान मोदींनी भाष्य केली. आरोग्य क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे, आणि त्यासाठी सरकार बांधील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!