स्वामी नामाच्या जयघोषात पुणेकर मंत्रमुग्ध !
स्वामी भक्त विरेंद्र किराड यांना स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा पुरस्कार प्रदान
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात रविवारी सायंकाळी पुण्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या स्वामी सेवा पुरस्काराचे थाटात वितरण झाले. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पालखी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा सध्या पुण्यात आहे.
दरवर्षी ती पुण्यामध्ये येत असते.दरवर्षी याचे उत्साहाने स्वागत केले जाते.यावर्षीही चार दिवस ही पालखी पुण्यामध्ये होती.या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. याच ठिकाणी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला.यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार-२०२५ हा पुण्यातील स्वामी भक्त विरेंद्र किराड यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने यांच्यासह स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू- पराग कालकर, न्यासाचे सचिव शामराव मोरे, न्यासाचे खजिनदार लाला राठोड, अखिल मंडई पुणेचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अण्णासाहेब थोरात ,चंद्रकांत तथा भाऊ कापसे, न्यासाचे कायदे विषयक सल्लागार अॅड. नितीन हबीब, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, विजयराव काजळे, नामदेवराव मोहिते, शिरीष मावळे, विलास चव्हाण, राजाभाऊ वरखेडे, विनायक घाटे, गोगावचे सुपुत्र उद्योजक मधुकर सुरवसे,बाळासाहेब कुलकर्णी-देसाई-बबलादकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार शिरोळे म्हणाले,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षापासून सुरु असलेले अन्नछत्र मंडळ हे आम्हां पुणेकरांचे श्रद्धा स्थळ असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.पुढे बोलताना आमदार शिरोळे म्हणाले, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाआशीर्वादाने असंख्य भक्तांचे कल्याण झाले असून स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येत आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धार्मिक कार्याबरोबरच पालखी पादुका परिक्रमा ही महान परंपरा पुढे नेत असल्याचे यावेळी आमदार शिरोळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.आमदार हेमंत रासने यांनी भोसले पिता-पुत्र यांनी न्यासाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक, आपदग्रस्थाना मदत, आरोग्यविषयक आदि विविध कार्यक्रम राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते ही बाब ही उल्लेखनीय असल्याचे सांगून गेल्या २ दशकाहून अधिक काळ श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा आम्हा पुणेकरांना एक सांस्कृतिक परवणीच असल्याचे यावेळी आ. रासने म्हणाले. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू- पराग कालकर म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून पुण्याच्या सांस्कृतिकतेत भर पडत असल्याचे सांगून, पालखी परिक्रमेच्या माध्यमातून सकल स्वामी भक्तांना एकत्र करण्याचे काम न्यास करत असल्याचे कालकर म्हणाले.यावेळी किराड यांनी अन्नछत्र मंडळाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.श्रीपाद थोरात, बाबा रोटे, राजाभाऊ शिर्के, माऊली लोणारे, सुरज थोरात, अविनाश सुपेकर, केम्पन्ना नाईक, संदीप चव्हाण, लाला गायकवाड, किशोर म्हस्के, रमेश माने, डॉ. संजय खेडकर, भगवान बलकवडे,दादा मोरे, नंदू कटके, पुष्कराज चिकणे, सिद्धांत काजळे, कोशल सलिम शेख, मोहन परखडे, श्रीपाद काळे गुरुजी, विजयराव खराडे, प्रसाद माने, चेतन वाघमले, विजयराव कराळे, डॉ. मंदार अंबिके, नाथाभाऊ परदेशी, राहुल मोरे, सचिन परदेशी, संदीप शेळके, प्रथमेश घाटे, हरिष मोरे, नारायण चांदणे, अजय जवेरी, संतोष तांजणे, प्रणव मलभरे व पै. अमोल पडळकर मित्र परिवार पुणे, अक्कलकोट घडामोडीचे धोंडाप्पा नंदे, स्वामिनाथ चौगुले, आनंदराव चौगुले,मारुतीराव बोरकर, महिंद्रकर, धनंजय सुरवसे, स्वामिनाथ बाबर,गणेश भोसले, राहुल इंडे, महांतेश स्वामी, प्रशांत साठे, संतोष माने, गोकुळ पाटील, संतोष दणके यांच्यासह पुणे शहरातील बहुसंख्येने स्वामी भक्त उपस्थित होता.कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार विनायक घाटे यांनी मानले.
प्रामाणिक सेवेचे फळमाझे वडील माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या समवेत मला श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सेवा व महाप्रसाद घेण्याचा योग आला. मंडळ स्वामी भक्तांची करत असलेली सेवा मला करायला मिळाली. धन्य झालो आज त्याच सेवेचे फळ आमदार रुपी मिळाले.– सिद्धार्थ शिरोळे,आमदार पुणे
महिलांच्या उपस्थितीत सामूहिक आरती
उपस्थित शेकडो महिलांच्या उपस्थितीत सामुहिक महाआरती मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाली. आरती नंतर दर्शन सोहळा व भक्तांना महाप्रसाद देण्यात आले.
या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने तुकाराम देठणकर, हर्षद कुलकर्णी यांचा शहनाई ग्रुप कार्यक्रमासह लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांचा साई सातसूर सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती गंधर्व मुकुंद बादरायनी यांचा स्वरसमर्थ अभंग वाणी तर योगेश तपस्वी व सहकारी यांचा स्वामी गीत सुगंध या कार्यक्रमासह रक्तदान शिबीर संपन्न झाले.